करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 13/3/2023 रोजी, जामखेड बायपास चौक येथे सकाळी अकरा वाजता कांद्याला हमी भाव मिळावा, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच महागाई, गॅस दर, पेट्रोल, डिझेल चे दर कमी करण्यात यावे. यासाठी आंदोलन करण्यात येणार असुन, सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सांवत यांनी केले आहे. सदरील आंदोलनाचे निवेदन करमाळा तहसिलदारांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सावंत गटाचे नेते सुनील सावंत, बबन जाधव, मनोज गोडसे, प्रदीप हिरडे, रघुनाथ झिंझाडे, मोहन शिंदे, सुरेश जाधव, फारुक जमादार, नवनाथ झिंजाडे, पांडुरंग शिंदे, बापू उबाळे, चंद्रकांत पवार आदींच्या सहया आहेत.
सध्या कांद्याला बाजारात दर नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नाफेडची केलेल्या घोषणेचे पुढे काय झाले? तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अदयाप पर्यंत मदत मिळाली नाही. तसेच सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई डिझेल-पेट्रोल चे वाढलेले दर कमी करण्यात यावे. यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सुनिल सावंत- नेते सावंत गट



Post a Comment