Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
            करमाळा तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व धम्म चळवळीचे सातत्याने काम करणारी संघटना म्हणून, भारतीय बौद्ध महासभेची संपूर्ण करमाळा तालुक्याला ओळख आहे. सामाजिक, वैचारिक व बौद्ध धम्माची चळवळ या संघटनेच्या माध्यमातून सतत सुरू असते. परंतु या संघटनेमध्ये असणारे बौद्धाचार्य सावताहरी कांबळे जे भारतीय बौद्ध महासभा करमाळा तालुका उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे, त्यांनी संघटनेपासून फारकत घेतले असल्याचे सावताहरी कांबळे यांनी सांगितले.

           दिनांक 24 मार्च रोजी करमाळा येथे संघटनेतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय बौद्ध महासभेची बैठक आयोजित केली होती. सदरील बैठकीमध्ये परत एकदा माझ्याकडे भारतीय बौद्ध महासभा करमाळा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु संघटनेमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ व वर्चस्ववाद मी वरिष्ठांकडे सातत्याने तक्रारीद्वारे सांगितला होता. वरिष्ठांनी तक्रारीकडे नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे, मी स्वतःहून संघटनेपासून फारकत घेतली आहे. मी २५ ते २६ वर्षे झाले महापुरुषांच्या विचारधारेचे सातत्याने काम करत आलो आहे. व इथून पुढे हि महापुरुषांच्या विचारधारेचे धम्म चळवळीचे कार्य वैयक्तिकरित्या निरंतर सुरू ठेवणार आहे.

बौद्धाचार्य सावताहरी कांबळे, करमाळा

Post a Comment