Header Ads Widget

 


करमाळा ता.-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
              सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ संचलित आमदार संजयमामा शिंदे, द सहकारी संस्था मर्यादित मांगी येथे सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनी नव्याने सुरू केलेल्या, दूध डेअरी व दहा गावातील दुध संघाच्या केंद्राचा उद्घाटन सोहळा, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह  शिंदे व विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांचे शुभहस्ते, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. डेअरी तर्फे शेतकऱ्यांना 23 गाईंचे वाटप करण्यात आले होते. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल दीडशे लिटर दूध या डेअरीमध्ये जमा झाले.
            यावेळी विविध मान्यवरांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांनी मांगी पंचक्रोशीतील जास्तीत-जास्त दूध उत्पादकांनी या डेअरीला दूध देऊन सहकार्य करावे. तसेच दुधाच्या गुणवत्तेनुसार आम्ही जास्तीत-जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू असे आव्हान शिंदे यांनी केले. तसेच दुसऱ्या डेअरी प्रमाणे उचल देऊन दूध उत्पादकांना डेअरीला बांधील ठेवण्यापेक्षा त्यांच्या दुधाला आम्ही जास्तीत-जास्त भाव  देणार आहोत असे आश्वासन दिले. तसेच या कार्याबद्दल सुजित बागल यांचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर पाटील व राजीव सरोळीकर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध वाढीबद्दल विशेष मार्गदर्शन केले.

            यावेळी उद्धव माळी, डीसीसी बँकेचे आवटे साहेब, शाखाधिकारी माने साहेब, अधिकारी भडंगे, चव्हाण, नाईकनवरे, खंडागळे संचालक, चव्हाण व मांगी पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी, जातेगाव येथील काशिनाथ कामठे, रमेश खरात, प्रवीण शिंदे, गुरुजी बापूराव गायकवाड, पुनवर येथील बापू नरसाळे, वडगाव येथील शेगडे, काळे, पोचऱ्यातील विठ्ठल शिंदे, पिंपळवाडी येथील बापू काळे, खडकी येथील अंगद शिंदे, रोशेवाडी येथील आदिनाथ मोरे, मांगी येथील दीपक बागल ,संभाजी बागल, पप्पू शिंदे, रतन शिंदे ,अभिमान अवचर, नंदकुमार नरसाळे, पोपट नरसाळे ,हनुमंत बागल, प्रताप बागल, विष्णू बागल, दिवाण बागल, पोपट धुमाळ, गणेश नरसाळे, स्नेहल अवचर, अण्णा बागल, वैभव बागल, राजेंद्र मुरकुटे, प्रेम चव्हाण, ऋषिकेश शिंदे, नवनाथ अवचर, ऋषिकेश बागल व इतर हि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन अनिल बागल यांनी केले. यावेळी मांगी ग्रामस्थांतर्फे मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Post a Comment