करमाळा तहसीलदार यांनी रस्ता मंजूर केलेल्या आदेशाची केम मंडल अधिकारी यांनी एकतर्फी कारवाई करून, अन्याय केल्यामुळे वडशिवणे तालुका करमाळा येथील शिक्षक सुहास काळे यांनी, दिनांक 5 एप्रिल पासून करमाळा तहसील समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मी वडशिवणे तालुका करमाळा येथील रहिवासी असून, वडशिवणे हद्दीतील गट नंबर 64 /2 मध्ये २००१ पासून कुटुंबासहित वास्तव्यास आहे. त्या ठिकाणाहून आज पावे तो कोणताही रस्ता अस्तित्वात नाही. व गट नंबर 67 मधील ब्रह्मदेव काळे यांनी तहसीलदार साहेब यांच्याकडे रस्ता मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. सन 2013 मध्ये तहसीलदार करमाळा यांच्याकडून गट नंबर 68 च्या उत्तर बांधावरून पाच फूट व गट नंबर 64 च्या दक्षिण बांधावरून पाच फूट असा रस्ता मंजूर झाला. त्यानंतर दिनांक २१/३/२०२३ पर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा रस्ता केला नाही किंवा वहिवाट देखील केले नाही. परंतु अचानक दिनांक 21/03/2023 रोजी मंडळ अधिकारी तलाठी भाऊसाहेब हे पोलीस बंदोबस्त घेऊन आले. आमचे कोणतेही म्हणणे न ऐकता रस्ता आदेश दोन्ही गटाच्या बांधावरून पाच फूट असताना जबरदस्ती करून, फक्त आमच्या एकट्याच्या शेतातून सुमारे 12 ते 14 फुटी रुंदीचा रस्ता तयार केला. त्यामध्ये आमच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. व पिकांना पाणी देण्यासाठी असणारा पाठ देखील मोडून टाकण्यात आला.
यासंदर्भात दिनांक 5 एप्रिल पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक सुहास काळे यांनी दिला आहे. याच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, उपजिल्हाधिकारी कुर्डवाडी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.



Post a Comment