करमाळा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आवारात यंदाच्या भिमजयंतीची नियोजन बैठक व पदाधिकारी निवडी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भिमसैनिकांच्या उपस्थितीत कार्यकारणीच्या निवडी संपन्न झाल्या. भिमजयंतीचे स्वरूप हे सर्वंकष व सर्वसमावेशक असावे. या हेतूने सर्व जातीधर्माचे पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव भोसले यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच गतवर्षीचीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली असुन, फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार हि करण्यात आला. यावेळी गतवर्षीच्या अहवालाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. गतवर्षीच्या जयंतीसाठी नागेश कांबळे यांनी स्वतःचे 83,000/- रु खर्च केले होते. तसेच वर्षभर सर्व महापुरुषांची जयंती व सामाजिक कार्यक्रम देखील शिव-फूले-शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून स्वखर्चाने करत, चळवळीत विचार पेरण्याचे काम नागेशदादा करत असल्याचे प्रतिपादन प्रफुल्ल दामोदरे यांनी बैठकीदरम्यान मांडले. त्यामुळे नागेश कांबळे यांचा सन्मान संभाजी ब्रिगेडचे नितिन खटके तसेच सर्व समविचारी संघटनांनी विशेष सन्मान केला.
यावेळी कायदेशीर सल्लागार म्हणुन ॲड. नवनाथ राखूंडे यांची निवड करण्यात आली. ताया वाघमोडे, जीवन होगले, इसाक पठाण, युवराज जगताप, शरद पवार, जयकुमार कांबळे, हणुमंत मांढरे, आर.आर.पाटील. माजी नगराध्यक्ष दिपकराव ओहोळ इ. पदाधिकारी विचारपीठावर उपस्थित होते. सुत्रसंचालन भिमराव कांबळे सर यांनी तर प्रास्ताविक दिपकराव ओहोळ यांनी केले. नुतन पदाधिकारी निवडी युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी जाहीर केल्या.


Post a Comment