Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
            करमाळा तालुक्यामधील अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवले आहे. नोव्हेंबर महिन्यात गाळपासाठी घेऊन गेलेल्या ऊसाची बिले अजून दिली गेलेली नाहीत. शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक आर्थिक अडचणीत आणण्याचे काम हे कारखानदार करत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच बँक कर्ज या दुहेरी संकटात शेतकरी असताना देखील, कारखानदार मात्र शेतकऱ्यांचे अर्थिक शोषण करताना दिसत आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊन गेल्यावर, पंधरा दिवसात बिल देणे बंधनकारक आहे. तसा नियम गाळप परवाना देताना घालून दिलेला असतो. परंतु कारखानदार मात्र मनमानी पध्दतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. मकाई सह. साखर कारखाना, कमलाई साखर कारखाना तसेच भैरवनाथ कारखाना यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकवले आहे.

          १० एप्रिल पर्यंत कारखानदारांनी ऊसाचे बील अदा न केल्यास केल्यास, समविचारी पक्ष, संघटना यांना सोबत घेऊन साखर आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात इशारा दिला आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावरती शहर अध्यक्ष शिवराज जगताप, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, गौरव झांजूर्णे, अनिल आरणे, अक्षय शिंदे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

Post a Comment