मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने नालबंद मंगल कार्यालय येथे मुस्लिम समाजातील बालकांची खतना रविवारी सकाळी आठ ते सांयकाळी सहा वाजे पर्यंत, ११२ बालकांची धार्मिक पध्दतीने सोलापुर येथील नामवंत खतना स्पेशालिस्ट डाॅ. उजेर बेग यांनी शस्त्रक्रिया केली. रविवारी सकाळी मौलाना सिंकदर मौलाना, अन्वर शेख, बकशभई शेख़ यांनी प्रार्थना करुन खतना कॅम्पचा शुभारंभ केला. यावेळी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, युवा नेते अरबाज बेग, असलम हुसेन, नालबंद मुस्तकीन पठाण, पै. समीर शेख़, जमीर मुलाणी, जमीर सय्यद, अकबर सय्यद, चाॅद बेग, कै. नामदेराव जगताप ऊव्द्रु प्राथमिक शाळेचे अध्यक्ष मझहर नालबंद, हाजी हमीद सय्यद आदी जणांच्या उपस्थितीत खतना कॕम्पची सुरवात करण्यात आली. यावेळी या शिबीरात ११२ मुस्लिम बालकांनी सहभाग नोंदवला होता.
| यावेळी मौलाना सिंकदर म्हणाले की, इस्लाम धर्मात खतना ला विशेष महत्व आहे. खतना करणे ही इस्लाम धर्माची प्रथा असली तरी, प्रत्येक मानवाच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टिने हिताचे आहे हे शास्त्रीय दृष्टया सिद्ध झाले आहे. या कॅम्प मुळे सामाजिक धार्मिक तसेच आर्थिक बचत होऊन, सामाजिक एकोप्याचे दर्शन होऊन व सलोखा निर्माण होतो. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील बालकांची सोय होते. आणि यामधुन खरे सामाजिक काम व समाजसेवा घडते. असे उपक्रम राबविण्याची भविष्यात गरज आहे. असे मौलाना सिकंदर यांनी त्यांचे मनोगत मांडले. |
यावेळी या शिबीरास अर्बन बँकेचे संचालक कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, आर. आर. पाटील, अरुण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, जिशान कबीर, जमीर मुलाणी, मौलाना मरगुलहसन, कय्युम शेख, रज्जाकभाई शेख आदीनी भेटी दिल्या. तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी समीर शेख, आयान बेग, मुबीन बागवान, शाहीद बेग, आसिम बेग, जावेद शेख, नदीम शेख, नवाज बेग आदी जणांनी परिश्रम घेतले



Post a Comment