Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
 
              महाराष्ट्राचे माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा वसा घेत, प्रहार सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील व सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने, करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त कौतुकास्पद काम करत, संपूर्ण दिवसभर केम गाव व मंदिर परिसराची स्वच्छता करून एक वेगळाच आदर्श घालून दिला.  महाराष्ट्रामध्ये केम हे गाव कुंकू साठी प्रसिद्ध आहे. या गावाला साधुसंतांची रंगभूमी सुध्दा मानले जाते. गावचे जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज हे आहे. या देवाची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते. श्री उत्तरेश्वर देवस्थान मंदिर परिसरात असलेली अस्वच्छतेमुळे, यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये. यासाठी संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत, प्रहार संघटनेचे पदाधिकारी तसेच श्री उत्तरेश्वर हायस्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, केम पंचक्रोशीतील युवक वर्ग, सामाजिक, राजकीय, नागरिक, व्यापारी, देवस्थान ट्रस्ट यांनी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

             यावेळी या स्वच्छता अभियानामध्ये प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता. तसेच भाजप तालुका उपसरचिटणीस धनंजय ताकमोगे, सामाजिक युवा अध्यक्ष सचिन रानशिंगारे, पै. मदन तळेकर, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक ही यावेळेस उपस्थित होते.

Post a Comment