करमाळा ता.-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
गेले काही दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. वारंवार विनंती करून हि राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्यामुळे, हा बेमुदत लाक्षणिक संप पुकारलेला आहे. १) राज्य सरकारच्या येणाऱ्या बजेटमध्ये भरघोस मानधन वाढ करावी २) ग्रॅज्युएटी मिळावी ३) ऑफिशियल कामासाठी नवीन मोबाईल देण्यात यावा ४) रिटायर होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू व्हावी. अशा विविध बागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी लक्षणीय संप पुकारलेला आहे. परंतु गेले काही दिवसांपासून एक ही नेता किंवा पुढारी या अंगणवाडी सेविकांचं दुःख व्यथा ऐकायला तयार नाही. घरी कुटुंबातील मुलं बाळ उपाशी राहुन अंगणवाडी सेविका गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आमच्या मागण्या लवकरात-लवकर मान्य न केल्यास मंत्रालयात घुसून मंत्र्यांना बांगड्या भेट देणार. अशा संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. सध्या अंगणवाडी सेविकांना साडेआठ हजार मानधनामध्ये काम करावे लागत आहे. एवढ्या तुटपुंज्या मानधनात वाढती महागाई व कुटुंबाचं पालन पोषण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे कित्येक मदतनीस, अंगणवाडी सेविका कुटुंबाचे उदरनिर्वाह व्याजाने उसने पैसे घेऊन करत आहेत. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी महिन्याच्या मीटिंग असतात. यासाठी पदरमोड करून जावे लागते, अंगणवाडी तील कामासाठी महागडे रजिस्टर, वह्या स्वखर्चाने घ्याव्या लागतात. त्यातच वेळेवर मानधन होत नसल्यामुळे विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना सारख्या भयानक संकटात ही अंगणवाडी सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केलेली आहे. या सर्व गोष्टींचा मात्र राज्य सरकारला विसर पडत आहे.



Post a Comment