प्रती हज अर्थात मक्का मदिनेत उमराह यात्रेस गेलेल्या महिलेचा मदिनेमध्ये शुक्रवारी अकस्मात मृत्यू झाला आहे. जैतुनबी नुरमहमद आतार वय 65 रा.रावगाव तालुका करमाळा असे मृत्यु झालेल्या भाविकेचे नाव आहे. मक्का मदिना उमराह याञेला रावगाव येथील रहिवाशी जैतुनबी नुरमहमद आतार हे आठवड्यापूर्वी मुलगा व सुनेसह गेले होते. मदिना या पवित्र स्थळी भ्रमण करत असताना त्यांचे अचानक निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवार ची जुमाची व इशाची नमाज पठण केली होती. अचानक त्यांना ताप आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गेली आठ दिवसांपासून त्या मुल शहानूर आतार व सुनबाई यांचे समवेत याञेत सामील झाल्या होत्या.
उमराह याञे दरम्यान मृत्यू येणे हे पुण्यकर्मच समजले जाते. अनेकजण हज अथवा उमराह यात्रेदरम्यान मक्का मदिनेत मृत्यु यावा अशी मनिषा बाळगत असतात. पैगंबरवासी जैतुनबी आतार यांच्यावर शनिवारी सकाळी मदिना येथे मोहम्मद पैगंबराच्या कबरी परिसरातील "जन्नतुल बकी कब्रस्तानात "दफनविधी करण्यात आला. पिपंरी चिचंवड येथील शिक्षक बिलाल आतार सर व किराणा व्यवसायिक शहानुर आतार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अकस्मात मृत्युमुळे मात्र रावगाव परिसरात दुख व्यक्त केले जात आहे. जैतुनबी यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.


Post a Comment