Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
             
अल्प आजाराने करमाळ्यात आजोबाचा मृत्यू झाल्याने, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुणे येथून येणाऱ्या नातवाला कुरकुंभ जवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरज संजय काबंळे उर्फ सोन्या वय 27 रा.करमाळा असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबतची हकीगत अशी की, करमाळ्यातील नगरपालिकेच्या रोजंदारीवर काम करणारे संजय ज्ञानदेव कांबळे यांचे वडील ज्ञानदेव कांबळे वय 85 हे आजारी पडले होते. त्यांना पाहण्यासाठी त्यांचा नातू सुरज उर्फ सोन्या हा माजंरी, पुणे येथून निघाला होता. दरम्यान आजोबा ज्ञानदेव यांचे 19 तारखेला खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा नातू सुरज संजय कांबळे हे माजंरी पुण्याहून मोटरसायकलवर मित्रासह करमाळ्याला निघाले होते. दरम्यान कुरकुंभ जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात सुरज कांबळे यांच्या बरगड्या मोडून ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्याचा मित्र हा किरकोळ जखमी झाला होता. यावेळी त्यांना दौंड येथील शासकीय रुग्णालयात, त्यानंतर पुन्हा लोणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

           सुरज संजय कांबळे हे माजंरी पुणे येथे कंपनीमध्ये कामास होते. 14 मे रोजी त्याचा विवाह ठरलेला होता. याचे ही नियोजन व व्यवस्था सूरजला करायची होती. दरम्यान त्याच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ केली जात आहे. सुरज कांबळे हे आजोबाच्या अंत्यविधीनंतर त्याच्या विवाहाच्या तयारीसाठी ते व्यवस्था करणार होता. असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मयत सुरज काबंळे याचे वडील संजय कांबळे यांना मात्र वडिलाच्या मृत्यूच्या दुःखाबरोबर मुलाच्या मृत्यूने मोठा आघात झाला आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात सुरज कांबळे यांच्यावर विद्यानगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. या घटनेने संपूर्ण सिद्धार्थ नगर, भिमनगर भागामध्ये दुःख व्यक्त केले जात आहे. होतकरू तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment