Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 
                संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा, उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्यास विधवा माता व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 500 गाथा  माता-भगिनींना वाटप करण्यात आल्या. या जयंती सोहळ्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदरील मिरवणुकीमध्ये मुला-मुलींनी व महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांची वेशभूषा परिधान करून या रणरागिनी घोड्यावरती स्वार झाल्या होत्या. महाराष्ट्राची परंपरा असणारी संतांची भूमी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची वेशभुषा धारण करुन अभंग गात टाळ, विना, मृदंग वाजवत मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन वारकरी धर्माची परंपरा जोपासली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. शेटफळ नागोबाचे येथील लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. योद्धा करिअर अकॅडमी झरे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती लेझीम खेळून मिरवणुकीला वेगळा साज चढविला होता.
मिरवणूकीतील प्रमुख आकर्षण आकर्षण....
(१) शेटफळ (ना.) येथील सर्व ग्रामस्थ मुलांचे लेझीम पथक
(२) योद्धा करिअर अकॅडमी झरे येथील ६० मुला-मुलींचे लेझीम पथक
 (३)  जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान येथील ६० मुलींचे ढोल पथक सोलापूर
(४) श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी 50 मुले यांची पायी वारी 
(५) शिवनेरी मर्दानी आखाडा व झांज पथक
       (५०) करकंब
(६) शिवरत्न मर्दानी आखाडा(३०) करकंब 
(७) स्वराज्य मर्दानी खेळ (३०) केम
(८) बाबुळगाव येथील हलगी पथक
(९) छत्रपती मर्दानी आखाडा करकंब 
(१०) मावळा ग्रुप अकलूज
(११) जेऊर येथील हलगी पथक
          जेऊर येथील सर्व चौकांमध्ये आकर्षक रोषणाईची व्यवस्था, ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती. तरी सदरील मिरवणुकीमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी सहभाग दिसुन आला.

Post a Comment