Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व मा. आ. शिवमती रेखाताई खेडेकर यांनी जेऊर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. व विविध विषयांवरती चर्चा केली. तसेच संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री नितीन खटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेतला. या भेटी प्रसंगी बोलताना खेडेकर म्हणाले की, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला. किंवा सामाजिक काम करत असताना काही अडचणी आल्यास, त्यांच्या पाठीमागे मराठा सेवा संघ व सर्व समविचारी संघटना त्यांच्या समवेत असतील.

         यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष शिवश्री अर्जुनराव तनपुरे, मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने, पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या ता. अध्यक्ष पल्लवी शिंदे, माळशिरस तालुका अध्यक्षा मनोहरा लावंड, प्रियांका खटके, आशा निमसे, पूनम कदम, सई खटके, बळीरामजी जाधव, संजय भोसले, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल, बालाजी गावडे, बाळासाहेब कर्चे, संजय गुटाळ, सचिन काळे, निलेश पाटील, विश्वनाथ सुरवसे, बंडू वाघमोडे! आदिनाथ माने, बाळासाहेब तोरमल, अनिल कादगे, प्रफुल्ल कुमार गोडसे, अतुल निर्मळ, राकेश पाटील, रोहन गरड, सचिन गारुडे, कौस्तुक कदम, पांडुरंग घाडगे, बाबू शिंदे, सागर बनकर, अभिजीत म्हमाणे, किशोर कदम, अर्जुन नाईकनवरे, बंडू मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment