Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                 घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे इम्पेरियल अध्यापक विद्यालय हांडेवाडी हडपसर येथे शिक्षण घेत असलेले, पंचफुला दिग्दर्शक विशाल संजय सरवदे आणि प्रोडूसर संजय सरवदे यांनी काढलेल्या, पंचफुला या लघु चित्रपटाला आत्तापर्यंत इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये 50 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळाले आहेत. त्याबद्दल २९ जानेवारी रोजी जयंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने, प्रा. तानाजी सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पंचफुलाचे दिग्दर्शक विशाल सरवदे यांना युनिक अवॉर्ड देऊन, जयंत शिक्षण प्रसारक मंडळ हांडेवाडी हडपसर येथे सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा हि दिल्या.

           यावेळी विशाल सरवदे यांनी बोलताना सांगितले की, पंचफुला फिल्म निर्माता, कलाकार, विशेष सहकार्य करणारी टीम, पडद्यावरील व पडद्या मागे राहून सहकार्य करणारे व थोरामोठ्यांचे आशिर्वाद यामुळेच हे सर्व यश मी मिळवू शकलो.

Post a Comment