Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
               करमाळा येथील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे कर्मचारी, दादासाहेब पिसे यांना गेल्या काही वर्षांपासून कविता लिहिण्याचा छंद जडला. भरपूर वाचन व अभ्यासु व्यक्तिमत्व असणारे पिसे यांनी सामाजिक, राजकीय ,हुंडाबळी, प्रेमभंग विरह ,आनंद, मैत्री, महापुरुष ,अशा विविध विषयांच्या काव्यातून त्यांनी सामाजिक प्रबोधन करत, आज पर्यंत तीन हजार कविता लिहिल्या आहेत. दादासाहेब सुभाष पिसे यांचे मुळगाव पंढरपूर तालुक्यात आनवली हे असून, ते मेकॅनिकल ड्राफ्ट्समन होते. परंतु मूळ व्यवसाय शेती असल्यामुळे त्यांनी शेती करण्यावरती भर दिला. त्यानंतर ते करमाळा येथे यशकल्याणी संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले. कविता लिहिण्याचा खरा छंद त्यांना 2019 पासून लागला.

               यानंतर त्यांनी सलग चार वर्षे कविता लिहीत 31 डिसेंबर 2022 पर्यंत 3000 कविता लिहिण्याचा एक विक्रमच केला. विशेष म्हणजे कविता लिहिता-लिहिता गीतांची रचना करण्यास ही भाग पाडले. आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी मोलाचे योगदान दिले. ते म्हणजे करमाळा येथील प्रसिद्ध पार्श्वगायक गीतकार व संगीतकार प्रवीणकुमार अवचर यांनी, तसेच त्यांच्या या लेखणीला बळ देणारी व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांचे मित्र रमेश नामदे गुरुजी, दयानंद चौधरी सर, खलील शेख, दीपक लांडगे, प्रकाश लावंड यांचे ही मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन राहिले. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन म्हणजे त्यांच्या काव्य लेखणीला चालायला-बोलायला लावणारे यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश करे-पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दादासाहेब पिसे यांचे अनोख्या काव्य विक्रमाची करमाळा तालुक्यातून प्रशंसा होत आहे. आणि लवकरच त्यांचा कवितासंग्रह सुध्दा प्रसिद्ध होणार आहे.

Post a Comment