करमाळा-प्रतिनिधी
दत्त मंदिर ते कोर्टाकडे जाणारा रस्ता हा मुख्य रहदारीचा रस्त्ता आहे. रोज हजारोंच्या संख्येने या मार्गाने विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा वावर आहे. आणि तो रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच रस्त्यावरुन रोज दोनशे ते तीनशे ट्रॕक्टरनी ऊसाची वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याची चेष्टा न करता जि.प.बाधकाम विभाग, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणत्याही विभागाने रस्ता ताब्यात घ्यावा. जमत नसेल तर खाजगीकरण करून कोणत्याही संस्थेला ताबा देण्यात यावा. त्याचप्रमाणे रस्ता दुरुस्त केला व त्यानंतर सुध्दा जर हा रस्ता खराब होत असेल. तर कारखान्यांकडून दरवर्षी रस्ता दुरुस्ती करून घ्यावा. यापैकी कोणताही एक निर्णय घ्यावा, अन्यथा भिमदल संघटना शुक्रवार दि.27/1/2023 रोजी ठिक 12.30 वाजता दत्त मंदिर ते कोर्ट रस्त्यावर आंदोलन करणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन भिमदल संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. हे निवेदन देतेवेळी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, भारिपा जिल्हा उपाध्यक्ष देवा लोंढे, भिमदलचे आण्णा साळवे, भिमदलचे गुणवंत ठोसर, कांबळे नंदुभाऊ, तुषार घोडके, जाधव प्रदिप, धाकतोडे बापुराव, धाकतोडे दत्तात्रय, धाकतोडे बाळासाहेब आदिजन उपस्थित होते. सदरिल निवेदन करमाळा तहसीलदार समीर माने, करमाळा पोलीस स्टेशन करमाळा, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले आहे.




Post a Comment