करमाळा-प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा करमाळा यांच्या वतीने करमाळा येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये, सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे उपासक, उपासिका केंद्रीय शिक्षिका, सर्व पक्ष संघटना, विविध चळवळीतील अध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक प्रशांत कांबळे यांनी त्यांचे विचार मांडताना सांगितले की, सर्व शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे महत्व सर्वांना पटवून देऊन, संविधानाविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी शासकिय कार्यालयांमधून सुरुवात होणे गरजेचे आहे. तरच सर्वांना भारतीय संविधानाचे व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या कष्टाचे महत्व समजणार आहे. अशा प्रकारचे प्रतिपादन कांबळे केले.



Post a Comment