Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
              सोलापूर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम नवघरे यांच्यावर हल्ला करणा-या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वानकर याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महा. उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील निवेदनाची दखल घेऊन स्वीय सहायक जाधव यांना पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत.

        आधीच आजाराने त्रस्त असलेल्या उत्तम नवघरे यांना सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे चर्चेसाठी बोलावून, प्रकाश वानकर व त्यांच्या सहकारी गुंडातर्फे जबरी मारहाण करण्यात आली होती. तरी ही वानकर याच्याविरोधात प्रशासनाने गंभीर गुन्हे दाखल केले नाहीत. वानकर हा लॅण्डमाफीया असुन प्रशासनाशी संबंध असल्यानेच, त्याच्यावरील कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप देखील सदरील निवेदनात करण्यात आला आहे. 

Post a Comment