Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
            कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पाटील गटाच्या सौ. अश्विनी गणेश सव्वाशे यांची बिनविरोध निवड झाली असून, आज माजी आमदार नारायण पाटील कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कोंढेज ता. करमाळा येथील ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाची एकहाती सत्ता असून, गेली दोन पंचवार्षिक निवडणूकीत पाटील गटाच्या पॅनलने विजय संपादन केला आहे. तत्पूर्वी सरपंच सौ. छाया कांतीलाल राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी आज निवड पार पडली. निवड प्रक्रिया कोंढेज ता. करमाळा येथील कार्यालयात रितसर पद्धतीने करण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सौ. अश्विनी सव्वाशे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी वळेकर यांनी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर केले. यानंतर सर्व पदाधिकारी व नुतन सरपंच यांचे जेऊर ता. करमाळा येथे सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभ प्रसंगी शेलगाव (वां.) चे सरपंच अमर ठोंबरे, जेऊरचे माजी सरपंच अनिलकुमार गादिया, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जूनराव सरक, महाराष्ट्रातील नामांकीत मल्ल तथा मुंबई महापौर कुस्ती केसरी गदेचा मानकरी पै. विजय गुटाळ, मल्लखांबचे आंतरराष्ट्रीय पंच पांडूरंग वाघमारे उपस्थित होते. 
         यावेळी मान्यवरांचे हस्ते नूतन सरपंच सौ. अश्विनी सवाशे, माजी सरपंच सौ. छायाकाकु राऊत, विद्यमान उपसरपंच तथा बाजार समितीचे माजी संचालक शहाजी राऊत, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य गोविंदनाना लोंढे, ग्रां पं. सदस्या सौ. सारीका जालिंदर आदलिंग यांचे सत्कार करण्यात आले. 

           या कार्यक्रमाला माजी सरपंच नागनाथ आदलिंग, निवास सालसकर, गणेश सालसकर, वि. वि. का. सेवा सोसायटी संचालक संजय लोंढे, निलेश राऊत, शिक्षण समिती उपाध्यक्ष रेवननाथ आरणे, पोपटराव वाघमोडे, चंदू माने, बबन माने, वसंतराव इंगोले, मेजर रविंद्र सवाशे, गणेश कोष्टी ,सचिन जगताप, किरण जगताप, प्रभाकर करे, बाळासाहेब जगताप, दशरथ जगताप, नागनाथ इंगोले, बाबू इंगोले, ओंकार सव्वासे, सोमनाथ सव्वासे, दत्तात्रय सव्वासे, समाधान इंगोले, दिपक खात्री, प्रेमकांत सामसे, सुशांत सामसे, दिलीप करे, जालिंदर माने, श्रीधर भोरे, राहुल भोरे, सोमनाथ माने आदिजन उपस्थित होते.
          यावेळी पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जूनराव सरक यांनी ग्रामविकास करताना गटतट बाजूला ठेऊन सर्वसामान्यांच्या हिताची कामे करावीत, असा सल्ला देत असताना पारदर्शक व लोकाभिमुख कारभार असावा हि अपेक्षा व्यक्त केली. उपस्थितांचे आभार माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष पोपटराव वाघमोडे यांनी मानले. या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी जेऊर व कोंढेज येथे फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलालाची उधळण करून आनंदोस्तव साजरा केला. निवडणुक प्रक्रिया मंडल अधिकारी वळेकर, ग्रामसेवक अंगद माने, गावकामगार तलाठी डोणे यांनी पार पाडली.

Post a Comment