करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुका साहित्य मंडळ या संस्थेच्या वतीने 2021/22 यावर्षीचा "बुधभूषण काव्य पुरस्कार" कवी पुनीत मातकर यांच्या "ऐन विणीच्या हंगामात" या काव्यसंग्रहास जाहीर करण्यात आलेला असून, हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 25 डिसेंबर रोजी सांयकाळी 5:00 वा. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात, समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कवी प्रकाश लावंड यांनी दिली आहे. रोख 5000 रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुप्रसिद्ध लोककवी, सिनेपार्श्वगायक, संगीतकार प्रशांत मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असून, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या, या समारंभास प्रसिद्ध कवी प्रा. डॉ.सुरेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराचे यंदाचे हे प्रथम वर्ष असून येथून पुढे दरवर्षी कवी ,लेखक यांच्या दर्जेदार साहित्यकृतीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा तालुका साहित्य मंडळ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9:30 ते 11:00 यादरम्यान "ग्रंथदिंडी", 11:00 ते 1:00 यादरम्यान "गझल मुशायरा व कवी संमेलन" आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनास वैभव कुलकर्णी- पंढरपूर, बबन धुमाळ- दौंड, प्रसन्नकुमार धुमाळ, तुषार बारंगुळे, दीपक लांडगे, प्रिया कौलवार, विजय खाडे, नवनाथ खरात, कालिदास चौडेकर, डॉ.सुनीता दोशी, डॉ.राजेंद्र केंगार यांच्यासह महाविद्यालयीन व स्थानिक कवी, कवयित्री सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे संचालन निलोफर फनिबंध या करणार आहेत. तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन नवनाथ खरात करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य नागेश माने, कवी दीपक लांडगे, विवेक येवले, कवी खलील शेख, डॉ.सौ .सुनीता दोशी यांनी केले आहे.


Post a Comment