Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
           मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्ती दिनानिमित्त करमाळा येथील त्याग मूर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर या ठिकाणी सामुदायिक धम्म वंदना घेण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका शोभाताई कांबळे मॅडम यांनी "मनुस्मृति दहन दिन व स्त्री मुक्ती दिन" या विषयावर सखोल असे व्याख्यान दिले. यावेळी बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांनी मनुस्मृति, भीमाबाई, संत गाडगे महाराज यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी कालकथित अश्रू बापू जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विशाल जाधव, पल्लवी जाधव, अनुराधा अश्रू जाधव यांनी बुद्ध विहारात खाऊचे वाटप केले. या कार्यक्रमातच ख्रिसमस नाताळानिमित्त सर्व ख्रिश्चन बांधवांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शुभेच्छा हि देण्यात आल्या.

              या कार्यक्रमास महाराजा कांबळे, एल.यु. कांबळे सर, भरत कांबळे, विकी कांबळे, रणवीर मंडलिक, निलेश कांबळे, शोभाताई कांबळे मॅडम, धाकतोडे मॅडम, जयश्री कांबळे, शालन कांबळे, वंदना कांबळे, राधाबाई कांबळे, अंजना कांबळे, वाघमारे बाई, शारदा कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव कांबळे सर यांनी केले.

Post a Comment