करमाळा-प्रतिनिधी
दि. २६ व २७ डिसेंबर २०२२ रोजी साडे येथे झालेल्या करमाळा-२, बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा, नेरले शाळेने घवघवीत यश मिळवले आहे. मोठा गट (मुली कबड्डी), लहान गट (मुली कबड्डी) आणि लहान गट (मुले खो-खो) या स्पर्धेत नेरले शाळा विजयी झाली आहे. व करमाळा तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मुलांना शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग जाधव सर, शाळेतील शिक्षक रामचंद्र मोरे, जाकीर मनेरी, दिपक ओहोळ व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, नेरले यांनी अभिनंदन केले. शाळेतील विद्यार्थी श्रुतिका गवळी, सखुबाई क्षिरसागर, स्वप्नाली मांगले, रेणुका काळे, जीविका भोसले, यशस्वी काळे, हर्षद शिंदे, हार्दिक जगताप यांनी विशेष नैपुण्य दाखवले.



Post a Comment