करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वांगी नंबर-४ येथील रहिवासी राज शहाजी शेटे-देशमुख यांच्या शेतातील डीपी चोरीला गेला असल्याबाबतचे निवेदन, महावितरण जेऊर येथे त्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि, माझी वांगी नं-४ येथे शेती आहे. माझा गट नं. ३६६ येथे ३० ते ३५ वर्षांपासुन लाईट डीपी अस्तित्वात होता. माझ्या शेतातील शेटे लाईट डीपी चोरी गेला असल्यामुळे, माझ्या शेती क्षेत्रावरील ऊस व तरकारीची उभी पिके, वीज नसल्यामुळे पाणी देता येत नसल्या कारणाने जळू लागलेली आहेत. दिनांक 19/12/2022 रोजी अज्ञात इसमाने येऊन महावितरणचे कोणीही कर्मचारी उपस्थित नसताना, ट्रॅक्टर नं. MH-45 B-6787 या वाहनाने घेऊन गेलेले आहेत. सदरील घटनेबाबत अद्याप पर्यंत करमाळा पोलीस स्टेशनमध्ये महावितरण कडून कोणत्या ही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. अथवा महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी याबाबत चौकशी करून कारवाई केलेली नाही. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करावा. व माझ्या शेतातील माझा लाईट डीपी मला परत मिळवून द्यावा. अशा प्रकारचे निवेदन राज शहाजी शेटे-देशमुख यांनी महावितरण जेऊर येथे दिले असुन, सदरील डीपी चोरी संबंधी वरीष्ठ अधिकारी कार्यालयाशी ही पत्रव्यवहार केलेला आहे....



Post a Comment