करमाळा-प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील व इतर वाचाळवीर आमदार यांच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात तसेच करमाळा तालुक्यात हि जनआक्रोश पसरलेला आहे. त्याचप्रमाणे समविचारी व बहुजनवादी सर्व सहसंघटना निषेध व्यक्त करत आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींने, तथा आजी-माजी आमदार, खासदार यांनी कोणत्या ही प्रकारचा साधा निषेध सुध्दा व्यक्त केलेला नाही. यावरून त्यांचे महापुरुषांवरील बेगडी प्रेम दिसून येते, त्यामुळे सर्वप्रथम या लोकप्रतिनिधींचा आम्ही जाहीर निषेध करतो.
मते मागताना सर्व लोकप्रतिनिधींना महापुरुष आठवतात. परंतु महापुरुषांचा अवमान होत असताना यांना महापुरुष दिसत नाहीत का? ही गोष्ट निंदनीय आहे याचा करमाळा तालुक्यातील जनतेने विचार करावा. निवडणुका जवळ आल्या कि, ह्याच नेतेमंडळींची शहरातील सर्व महापुरुषांना हार घालण्याची जणु स्पर्धाच लागलेली असते. आणि महापुरुषांच्या नावाने घोषणा तर अशा देणार, जसे कि आता सर्व महापुरुष उठून यांच्या स्टेजवरच येऊन बसणार आहेत. जे लोकप्रतिनिधी आता खुर्चीवरुन उठून, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा साधा निषेध सुध्दा व्यक्त करु शकत नाहीत. अशा लोकप्रतिनिधींच्या नोंदी आम्ही ठेवलेल्या तर आहेतच. परंतु या नेतेमंडळींचा कार्यकर्ता सुध्दा विचार करत असेल कि, मी निवडलेला माझा आजी-माजी लोकप्रतिनिधी निव्वळ षंड असल्यामुळे तो थंड आहे. जो महापुरुषांचा अवमान झाल्यानंतर ही साधा तोंड उघडण्यास तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी निदान राजकारणासाठी समाजाकडे न बाघता, समाजाच्या भावनांचा ही आदर करावा. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशपाल कांबळे यांनी केले आहे.

.jpg)

Post a Comment