करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांची आमदारकी म्हणजे कार्यकर्ता खुश करो आमदारकी बनलेली आहे. कारण की तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आवासुन उभे आहेत. तरीसुद्धा आमदारांना आठवड्यातील पूर्ण एक दिवस सुद्धा तालुक्याला देणे होत नाही. आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तालुक्यातील गावे विकण्यास, मतदानावर बहिष्कार टाकत तसेच दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तयार झालेली आहेत. हेच का करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार? घरतवाडी ग्रामस्थांना तुम्ही अशाच प्रकारे विकासाचे गाजर दाखविले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? त्या गावचा रस्ता, वीज, पाणी व आरोग्याच्या सुविधा गंभीर बनल्या आहेत. याकडे तुम्ही कधी लक्ष देणार आहात? तुमचा आठवडी बाजार बंद होणार आहे की नाही? तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न गंभीर बनलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवड्यातील फक्त दोन ते तीन तास तालुक्याला देऊ वाटतात. त्यामुळे तालुक्याच्या प्रश्नांकडे तुम्ही कधी लक्ष देणार? हा एक मोठा संशोधनाचा विषय बनलेला आहे. असो.... लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही घरतवाडी येथील ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण केले पाहिजे. परंतु अद्याप पर्यंत त्या ठिकाणी आपले चरण स्पर्श सुद्धा झालेले नाहीत. त्यामुळे तालुक्याला एक विकासप्रिय आमदार मिळाला असल्याच्या तेथील नागरिकांच्या भावना आता तीव्रपणे दिसून येत आहेत. अहो विकासासाठी नाही निदान त्या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी तरी तुम्ही त्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. परंतु अद्याप पर्यंत तेथील नागरिकांची साधी विचारपूस देखील तुम्ही केलेली नाही. चालू विधानसभेची पंचवार्षिक आणि मागील पंचवार्षिक विधानसभेच्या वेळेस घरतवाडीतील नागरिकांनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. हे तरी तुम्हाला आठवत असेल, निदान राजकारण म्हणून तरी या ग्रामस्थांची तुम्ही चौकशी करावी, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार नारायण पाटील हे सध्या आमदार जरी नसले तरी, लोकांच्या मनामध्ये आमदार म्हणून त्यांनीच घर केलेले आहे. त्या अनुषंगानेच त्यांनी वरिष्ठ पातळीवर घरतवाडीच्या रस्त्याचा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढे मांडला होता. व काही प्रमाणात तो प्रश्न सुटण्याची ही चिन्हे आता दिसू लागलेली आहेत. तरी येथील ग्रामस्थांच्या ही चेहऱ्यावर याबाबतीत काल घेतलेल्या भेटीदरम्यान समाधान दिसून येत होते. आबा आमदार होते त्यावेळेस कुंभारगाव ते घरतवाडी रस्त्याचे काम काही प्रमाणात झालेले आहे. आम्ही राजकारण हे समाजकारणाच्या हितासाठी केले. तीच तुम्हाला ही आम्ही विनंती करणार आहोत कि, भले तुम्हाला विकास करता येत नसेल, निदान तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी समजुन घेण्यासाठी तरी वेळ द्या!!!


Post a Comment