Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी
 
             दि. 15/12/2022 वार-गुरुवार नानासाहेब पिसे यांचे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका आटपाडी जिल्हा सांगली) यांचे श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालय केम येथे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान संपन्न  झाले. मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर यांनी केले.

          या कार्यक्रमात नानासाहेब पिसे यांनी प्रात्यक्षिक करून अंधश्रद्धेचे खंडन केले. आणि विज्ञानवादी विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोंडलकर पी.डी सर यांनी केले‌. वाघमारे के.एन. सर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment