दि. 10 डिसेंबर 2022 रोजी खुडूस तालुका माळशिरस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तसेच सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुदो कुस्ती स्पर्धेत भाळवणी येथील, ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा दादासाहेब जाधव तालमीतील मुली व मुलांनी चार सुवर्ण व तीन रौप्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये
१) पै.अनुष्का महेंद्र शिंदे हिने 14 वर्षाखालील 32 किलो वजनी गटात जुडो कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक व 14 वर्षाखालील 33 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे.
२) पै. प्रसाद पांडुरंग जाधव यांनी 14 वर्षाखालील 30 किलो वजन गटात जुडो कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले.
३) पै.शिवाजी बिभीषण बातखबर यांनी 17 वर्षाखालील 45 किलो वजन गटात रोमन ग्रिको प्रकारात रौप्य पदक मिळवले.
४) पै.सौरभ संभाजी डुकळे यांनी 17 वर्षाखालील 51 किलो वजन गटात रौप्य पदक मिळाले
५) पै. संकेत सतीश शिंदे यांनी 19 वर्षाखालील 82 किलो वजन गटात, रोमन ग्रिको प्रकारात सुवर्ण पदक मिळवले.
६) पै. सुरज गोपीचंद पांडुळे यांनी 19 वर्षाखालील 60 किलो वजनी गटात रोमन गिरको प्रकारात रौप्य पदक मिळवले.
या मल्लांना मुंबई महापौर केसरी पै. विज गुटाळ व वस्ताद पै. योगेश शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते नारायण जाधव सर, पैरालम्पिक जलतरणपटू सुयश जाधव सर पै. राजेंद्र गायकवाड, गुरुवर्य पै. नवनाथ खरात सर, मेजर पै.विशाल गायकवाड, आण्णा बातखबर, पै. अमोल फरतडे, पै. स्वप्निल पांडुळे, पै. प्रमोद शिंदे, पै. समाधान भोसले, गुरुजी अतुल घोगरे, पांडुरंग काटे साहेब, पै. बाळासाहेब जाधव पोलीस पाटील, विशाल धेंडे त्याचप्रमाणे समस्त भाळवणी गाव व पंचक्रोशीतील सर्वांचे सहकार्य लाभले. या सर्व पैलवानांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. मा.आ. नारायण पाटील यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले असुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.स्वर्गीय ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांचे चिरंजीव पै. रणजीत खाशाबा जाधव सरांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. व पुढे बोलताना म्हणाले कि, तालमीचे व गावाचे नाव पूर्ण भारतामध्ये करावे. अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण कष्ट करत आहात आणि कराल अशी आशा बाळगतो. अशाप्रकारे पै. जाधव यांनी प्रतिपादन मांडले.
यावेळी मा.आ. पै. नारायण पाटील ,नायब तहसीलदार प्रशांत खताळ, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै. अतुल पाटील ,महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगिरे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. राजेंद्र गायकवाड ,कंदरचे वस्ताद पै. उमेश इंगळे ,कविटगावचे सरपंच पै. शिवाजी सरडे , ढवळसचे वस्ताद पै. लक्ष्मण शिंदे तसेच भाळवणी ग्रामपंचायत व समस्त भाळवणीकर उपस्थित होते.



Post a Comment