Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
               श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी शाळेत माजी विद्यार्थी कु.संस्कृती सतीश तळेकर या विद्यार्थीनीला एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळाल्याबद्दल, आणि विशाल सतीश कोंडलकर याची इंडियन नेव्ही, वैभव सतीश कोंडलकर इंडियन आर्मी निवड झाल्याबद्दल, यांचा सत्कार तसेच पाचवी व आठवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर, शालेय समिती सदस्य संभाजी गुरव उपस्थित होते. मुख्याध्यापक कदम एस. बी. सर, पर्यवेक्षक सांगवी बी.व्ही सर, शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कुमारी संस्कृती सतीश तळेकर माजी विद्यार्थिनीने एम.बी.बी.एस. ला तयारी करताना कसा अभ्यास करावा? याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विशाल सतीश कोंडलकर आणि वैभव सतीश कोंडलकर यांनी इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही ला कसे सिलेक्ट व्हावे? यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता पाचवी नऊ विद्यार्थी व आठवी चार विद्यार्थी, स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय समिती अध्यक्ष दयानंद तळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
            या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वाघमारे के.एन. सर यांनी केले. सर्वांचे आभार कोंडलकर सर यांनी मानले. या सत्कार समारंभाला मुख्याध्यापक कदम एस.बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी. व्ही. सर, शारीरिक शिक्षण विषयाचे प्रा.अमोल तळेकर सर व तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment