Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी  

         आदिनाथ कारखाना सुरू करण्याच्या उद्देशाने बारामती ॲग्रोला अर्थात पवार घराण्याला आदिनाथ बचाव संघर्ष समिती स्थापन करून काही सदस्यांनी विरोध केला. व त्यानंतर अचानक जाग आलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे हात पसरले. व आपण कारखाना वाचवण्यासाठी किती मोठे प्रयत्न करत आहोत. हे तालुक्या समोर मोठे नाटक केले. काही कालांतराने या नाटकामध्ये दुसऱ्या एका पात्राचा प्रवेश झाला. आणि ते पात्र म्हणजे कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल!!! यांनी सुद्धा यामध्ये एक उत्तम अशी भूमिका निभावली. परंतु या दोघांचा आदिनाथ कारखान्यावरील रंगमंचावर नाटक प्रयोग जास्त वेळ चालला नाही. करमाळा तालुक्यातील जनतेने हा नाटक प्रयोग पाहण्यासाठी दर्दीपणा दाखवला खरा, परंतु आमदारकी आणि कारखानदारी या दोन्हीतून दोघांचाही मोह काही सुटला नाही. त्यामुळे सर्व तालुक्यासमोर दोघांचीही नाचक्की झाली, हे वेगळे सांगायला नको. कारखाना सुरू करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्यामुळे, शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे आम्ही सुद्धा कारखान्यावर आणि पाटील व बागल गटावर भाष्य करणे काहीसे टाळले होते. कारण तालुक्यातील जनतेचा असा गैरसमज होऊ नये की, दशरथआण्णा हे चालू गाडीला खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता मला बोलणे गरजेचे वाटत असल्यामुळे, मी तालुक्यातील जनतेसमोर बरेच दिवसातून व्यक्त होत आहे. आदिनाथ कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे अधिकार नसलेला व्यक्ती म्हणजेच हरिदास डांगे या व्यक्तीने कारखाना सुरू करण्यासाठी, सुरुवातीपासून त्यांच्यावर अनेक टीका झाल्या. तरी कोणत्या ही प्रकारे माघार न घेता कारखाना सुरू करण्यासाठी, त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले.

             बागल आणि पाटील गटाने हि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते. परंतु आता कारखान्याचे काम जरी प्रगती प्रथावर आले असले तरी, फक्त साडेतीन कोटी रुपयांची गरज भासत असल्यामुळे, हरिदास डांगे हे पैशांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या आधीही शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे आम्ही माजी आमदार नारायण पाटील व आदिनाथ कारखान्याच्या संचालिका सौ. रश्मी बागल त्याचप्रमाणे कारखान्याच्या संचालक मंडळाला विनंती केली होती की, बागल आणि पाटील यांनी एक एक कोटी रुपये कारखान्यासाठी द्यावे. तर संचालक मंडळाने त्यांच्या ऐपतीप्रमाणे पाच-पाच लाख रुपये द्यावेत. कारखान्यावरची आर्थिक अडचणीवर लगेच मात करता येईल. परंतु अद्याप पर्यंत या दोघांनीही त्यांच्या कोणत्याही रकमा जाहीर तर केल्या नाहीत. उलट कारखान्याच्या कोणत्याही बैठकीसाठी हे दोघे उपस्थित राहताना सुद्धा दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे कारखाना संचालक मंडळाच्या नातेवाईकांकडे कारखान्याचे येणे हे दहा ते पंधरा कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे ही समजत आहे. सध्या सह्यांचे अधिकार असलेल्या रश्मी बागल व संचालक मंडळाने या पैशाची वसुली करावी. व खरंच तुमची जी सध्या निवड झालेली आहे ती सार्थ झालेली आहे. याची प्रचिती तालुक्यातील जनतेला करून द्यावी. उद्धव ठाकरे यांची करमाळा तालुक्यामध्ये विधानसभेच्या वेळेस जी सभा झाली होती. त्यावेळेस आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी शब्द दिला होता. त्या शब्दासाठी त्यांनी निदान 12 ते 13 कोटी रुपये दिले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बागल व पाटील यांना ही आता हात किती पसरावे याचे भान राहिले पाहिजे. व ज्याप्रमाणे तुम्ही बारामती ॲग्रोला अर्थात पवारांना विरोध केला. त्याचप्रमाणे कारखाना सुरू करण्याची ही धमक तुम्ही दाखविली पाहिजे. साडे या गावातील पतसंस्थेकडून एक कोटी रुपये घेण्यापेक्षा जेऊर येथे नारायण पाटील यांची पतसंस्था आहे. तेथून एक कोटी रुपये व करमाळा येथे स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या नावाने ही दोन पतसंस्था आहेत. तेथून एक-एक कोटी रुपये, अशा प्रकारचे पैसे कारखान्यासाठी आपण का पुरवत नाहीत? तुम्ही कारखान्याला आता सुध्दा दुसऱ्याच्या दारात का उभा करत आहात? हेही तालुक्याला तुम्ही उघडपणे सांगितले पाहिजे. संचालक मंडळाला अध्याप पर्यंत आपण पैसे जमा करण्यासंबंधीचे कोणते आदेश दिलेले आहेत? याचे ही तुम्ही जर स्पष्टीकरण दिले तर तालुक्याला आदिनाथ कारखान्याविषयीचा मुद्दा आणखी स्पष्टपणे समजून येईल. ज्याप्रमाणे बारामती ॲग्रोला नारायण पाटील यांनी विरोध केला. त्याच हिंमतीवर त्यांनी त्यांचा ऊस फक्त आदिनाथ कारखान्यासाठी राखून ठेवायचा होता. तुम्ही तरी निदान तालुक्यात चांगल्या प्रकारे तुमचे नाव उजळमाथ्याने समोर आणायचे होते. हे तर मराठीतल्या म्हणी सारखे झाले "शेंबूड आपल्या नाकाला ज्ञान सांगे लोकाला" असो..... संचालक मंडळाने कारखान्यासाठी पाच-पाच लाख रुपये द्यावे. बागल आणि पाटील यांनी एक-एक कोटी रुपये कारखान्यासाठी द्यावे. बागल यांनी आतापर्यंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातुन अनेक राजकिय दिवाळे, दसरे साजरे केले. स्व दिगंबरराव बागल मामा ते सौ. रश्मी बागल व आताचे दिग्विजय बागल यांच्यापर्यंत हा राजकिय दिवाळी, दसरा सर्वांनी जोमाने पाहिला. परंतु आता सर्व शेतकरी सभासदांच्या घरामध्ये तुम्ही सुखाचा उजेड पाडणे तितकेच गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुम्ही मकाई कारखान्यासाठी तुमची मालमत्ता गहाण ठेवता, त्याप्रमाणे आदिनाथ कारखान्यासाठी सुध्दा तुमची मालमत्ता गहाण ठेवावी. कारण "मकाईसाठी एक न्याय आणि आदिनाथसाठी एक न्याय" हे वागणे बरोबर नाही, तरी वरील विषयाप्रमाणे "शेतकरी कामगार संघर्ष समिती" स्वतःचे एक लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी बागल व पाटील यांचे महानाट्य तालुक्याला व त्या आर्थी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला कोणत्या दिशेला घेऊन जाणार? किंवा आणखी किती खाईमध्ये नेणार? हे पाहावे लागणार आहे.

          आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारीचा प्रश्न पाच ते सहा वर्षांपासुन रखडत पडला होता. कारखान्यातील शिल्लक साखरेमधुन कामगारांच्या पगारी कराव्यात. यासाठी कामगारांनी व शेतकरी कामगार समितीने अनेक वेगवेगळी आंदोलने केली. त्या आंदोलनाचे फलित म्हणुन कामगारांना विक्री झालेल्या साखरेमधून एम.एस.सी. बँकेने पैसे देण्याचे ठरवले. व त्यांनी विक्री झालेल्या साखरेमधुन जवळपास साडेतीन कोटी रु. कामगारांना देण्यासाठी न्यायालयात जमा केले. परंतु पैसे बघितल्यावर या सांचालक मंडळाच्या तोंडाला पाणी न सुटले तर नवल.... न्यायालयाने कामगारांच्या खात्यावर सदरील पैसे वर्ग न करता ते कारखान्याच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची मागणी केली. त्यामुळे कामगारांना मिळणारे पैसे सध्या न्यायालयाकडे पडून आहे. कारखान्यामध्ये काम करणारा सर्व कामगार वर्गाला कारखाना प्रशासन आता पगारी न देता, फक्त रोजंदारीवर कामाला बोलवत आहेत. हा कुठला न्याय आहे, हे सर्व संचालक मंडळाने तसेच सौ. रश्मी बागल व मा.आ. नारायण पाटील यांनी उघडपणे तालुक्याला एकदा स्पष्टपणे सांगावे.

Post a Comment