Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                   
विक्रम शिंदे यांच्या साखर कारखान्याची वाहतूक करणारे उसाचे ट्रॅक्टर यु टर्न करताना पलटी होतात. या आठवड्यात चार ट्रॅक्टर पलटी झाले. मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणी ही हजर नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही, किंवा दुर्घटना झाली नाही. मात्र येणाऱ्या काळात कधीही मोठा अपघात होऊन जीव जाऊ शकतात. या घटना थांबण्यासाठी कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे कोणती उपायोजना करत नाहीत. यामुळे दोन-चार जणांचे प्राण गेल्यानंतरच विक्रम शिंदे या प्रकरणाची दखल घेणार का??असा खडा सवाल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपस्थित केला आहे. करमाळा देवीचा माळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. दररोज हजारो भक्त देवीच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी करतात. पांडे कडून येणारे ट्रॅक्टर टर्न मारून  संगोबाच्या दिशेने वळतात. यावेळी पहिली ट्रॅक्टर ट्रॉली पास होते, मात्र दुसरी ट्रॉली पलटी मारते या घटना वारंवार घडतात. या रस्त्यावरून शाळेला येणारे-जाणारे मुले व देवीचे भक्त चालत असतात. दुर्दैवी घटना घडली तर पाच दहा निष्पाप लोकांचे जीव जाऊ शकतात.

            पांडे कडून येणारा रस्ता व उस्मानाबादकडे जाणारा रस्ता येथे जवळपास तीन फूट चढ आहे. यामुळे हे ट्रॅक्टर पलटी मारतात. याची दखल तात्काळ विठ्ठल शुगरचे चेअरमन विक्रम शिंदे यांनी घेऊन पुढील अपघात टाळावेत, आवाहन चिवटे यांनी केले आहे. विक्रम शिंदे यांच्या कारखान्यातील बॉयलर मधून उडणारी राख अजून ही करमाळ्यातील सर्व छतांवर, कार गाड्यांवर पडते. प्रत्येकाच्या घरात या राखे मुळे भांडी खराब होत आहेत. या सूक्ष्म राखेमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. अनेकांना दमा सारखे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशी ही विषारी राख करमाळा शहरात पसरत राहिली तर, येणारी भावी करमाळ्यातील संपूर्ण नवी पिढी, वयोवृत्त झालेली मंडळी दमाग्रस्त व फुफुसाच्या आजाराने ग्रस्त झालेली असेल. यामुळे या बॉयलरची तात्काळ दुरुस्ती करून, राखेची व्यवस्था विक्रम शिंदे यांनी करावी. अन्यथा आम्हाला नाईलाजाने प्रदूषण महामंडळाकडे तक्रार करावी लागेल. असा इशारा ही चिवटे यांनी दिला आहे. करमाळ्यातील जनता अन्याय सहन करते, असा समज असेल, तर तो शिंदे यांनी बाजूला ठेवावा. व तात्काळ वरील प्रश्नांची दखल घ्यावी. अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने केली आहे.

Post a Comment