Header Ads Widget

 


वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)
               बार्शी तालुक्यातील अवलिया चित्रकार महेश मस्के यांनी अखेर काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतलीच. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर राहुल गांधींच्या "भारत जोडो" यात्रेत महेश मस्के पोहोचला. झेड प्लस सुरक्षा भेदून आणि अडीच किमी पायी प्रवास करून, मोठमोठ्याने राहुलजी,,,,, राहुलजी असे ओरडून त्यानी हिंगोलीमध्ये जाऊन राहुल गांधींच्या हातात-हात दिला. महेश मस्के हे नाव गेल्या 2 वर्षात बार्शीकरांना कलेच्या माध्यमातून चांगलेच परिचित झाले आहे. पेन्सिलने व्यक्तीचित्र रेखाटणारे महेश मस्के लॉकडाऊन काळात पिंपळाच्या पानावर आपली चित्रकला जोपासू लागले. त्यांच्या या कलेस लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यातूनच मस्के यांनीही अनेक दिग्गजांचे चित्र पिंपळाच्या, केळीच्या पानावर रेखाटले. आणि त्यांना भेट ही दिले. 
           माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ही त्यांनी चित्र रेखाटून त्यांना गिफ्ट केले. तर शरद पवार यांची ही त्यांनी भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची ही भेट घेऊन चित्र दिले होते. आता "भारत जोडो" यात्रेत थेट राहुल गांधींना भेटून त्यांनी केळीच्या पानावरील चित्र भेट दिले. यावेळी राहुल गांधींनी हातात-हात देत आस्थेने विचारपूस केली. तसेच पायी यात्रेत हे पान खराब होईल, त्यामुळे तुमच्याकडेच राहू द्या, असे ही मस्के यांना सुचवले. दरम्यान मस्के यांची राहुल गांधींना भेटण्याची धडपड कौतुकास्पद होती. प्रत्येक चर्चेतील दिगग्ज व्यक्तींना ते भेटतातच कसे? असा प्रश्न ही अनेकांना नेहमीच पडतो. त्याचं उत्तर हे दृढनिश्चय असंच आहे. मात्र राहुल गांधींना भेटून आजपर्यंतचा सर्वाधिक आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. बार्शी तालुक्यातील लहानशा जामगाव (पा.) गावातून आलेला हा तरुण कलाकार जिद्दी स्वभावामुळे, आज राहुल गांधींपर्यंत पोहोचला हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment