करमाळा-प्रतिनिधी (राजेश गायकवाड)
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित बाळे या संस्थेच्या 2022-2027 करिता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून, प्रचारात चांगलीच रंगत येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये माजी आ. दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला दत्तात्रय सावंत सर प्रणित सेवाभावी कृती पॅनल, हा पॅनल प्रचारात आघाडीवर व जोरदारपणे मुसंडी मारलेली दिसून येत आहे. या पॅनलचे सर्वच उमेदवार मतदार राजाची प्रत्यक्ष गाठी भेटी घेताना दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवार व प्रचार प्रमुख ही महत्वाची भूमिका पार पाडत असणारे, सुरेश उर्फ सूर्यकांत शिवाजीराव गुंड हे सर्वसाधारण मतदारसंघात आपले भवितव्य आजमावत आहेत. तसेच महात्मा फुले विद्यालय मोरवडचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर करमाळा तालुक्यातील मोरवड गावचे सुपुत्र आपले भवितव्य आजमावत आहेत. ही होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून, सर्वसमावेशक कार्यक्रम राबवू असे वारंवार सुरेश गुंड यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या मागणीला विरोधी गटाने न जुमानता निवडणूक लावून, वेळ व अनाठायी खर्च या बाबीस तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही निवडणूक विरोधी पॅनलकडून लादली गेली आहे अशाप्रकारे मोहोळकर यांनी सांगितले. गेली पाच वर्षे संस्था मोठ्या कर्जाच्या खाईतून बाहेर काढून, पूर्ण नफ्यात आणलेली आहे. कर्जाची मर्यादा सहा लाख वरून बारा लाखपर्यंत वाढवलेली आहे. व्याज दर 14% वरून 8% केलेले आहेत. हे व्याजदर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ते प्रचाराच्या निमित्ताने संगोबा येथील श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा या ठिकाणी आदिनाथ महाराज यांच्या पावन भूमीत बोलत होते. प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्वांचा सत्कार प्रशाळेचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. देवस्थानच्या वतीने राजेश गायकवाड यांनी विजयाची नांदी म्हणून श्रीफळ व फुल उपस्थितांना दिले. यावेळी माजी अध्यक्ष मुकूंद मोहिते सर, सेकंडरी पतसंस्थेचे संचालक प्रमोद देशमुख, संदिप आगलावे, प्रकाश क्षीरसागर, मुख्याध्यापक गौतम सांगडे, बळीराम गोफणे, जेष्ठ शिक्षक विठ्ठलराव रोडगे, किरण भागडे, शरद घाडगे, हनुमंत चांदणे, देवानंद चव्हाण, सौ. मीनल पाटोळे, सौ. कल्पना गायकवाड, पिंटू भोज आदीजन उपस्थित होते. प्रास्तविक किरण भागडे यांनी तर आभार विठ्ठल रोडगे यांनी मानले.



Post a Comment