करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे धायथिंडी येथील सुपुत्र कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुंबई, मोहन रामचंद्र माने यांनी माता-पिता चरण पूजन सोहळा शालेय साहित्य तुला केली. व अभिष्टचिंतन सोहळा धायखिंडी गावामध्ये विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. आई व वडिलांनी कष्ट करून मोहन माने यांना पोलीस उपनिरीक्षक केले. त्यांच्या उतराई मधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांनी मोठा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. धायखिंडी गावामधून पहिल्यांदाच प्रशासकीय अधिकारी म्हणून मोहन माने यांची निवड झाली आहे. धायखिंडी गावासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. हुशार, कर्तुत्वान मुलांना आर्थिक मदत व मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या कार्याच्या पुढच्या पिढीला त्यांनी आदर्श घालून दिला आहे. आई-वडिलां विषयी त्यांनी जे कृतज्ञता भाव व्यक्त केले. ते पुढच्या पिढीसाठी आदर्शवत आहेत. यावेळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना त्यांनी उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती.



Post a Comment