Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           जिंती ता.करमाळा येथे एस.यु.राजेभोसले हायस्कूलच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिनाचे औचित्य साधून, द्विदिवसीय व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे. त्या प्रसंगी प्रथम दिनाचे पुष्प गुंफण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्राचे नेते व प्रभावी वक्ते यशवंत गायकवाड यांना प्रमुख वक्ते म्हणुन बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
               यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यशवंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना बहुजन महापुरुषांच्या त्याग, समर्पन व समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ याविषयी अतिशय प्रभावी असे मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकात रयतेचे स्वाभिमानी स्वराज्य निर्माण करून, रयतेच्या मनामध्ये स्वाभिमान जागा केला. व 19 व्या. शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जाती निर्मुलन करून, सर्वांना समान न्याय व मुलभूत हक्क, अधिकार बहाल केले. म्हणून तर आपण स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. सर्वच बहुजन महापुरूषांनी कुठल्या ही जाती धर्मासाठी काम न करता सर्वांसाठी, सर्व व्यापक कार्य केलेले दिसून येते. अशाप्रकारचे महत्वपुर्ण असे विचार गायकवाड यांनी विद्यार्थ्यां पुढे मांडले.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब काटे सर होते. तर सुत्रसंचलन प्रा.राम हरी झांजुर्णे सरांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाघमोडे सर, झांजुर्णे सर, दिवसे सर, मोरे सर, काळे सर आदीनी परिश्रम घेतले. तर सर्वांचे आभार झांजुर्णे सरांनी मानले.

Post a Comment