Header Ads Widget

 


(ADVERTISE)
               भिमाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जनतेचे नगरसेवक मा. जयकुमार (भाऊ) कांबळे, यांच्या वाढदिवसानिमित्त १ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर देसाई आय. हॉस्पिटल करमाळा व्हिजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद़्घाटक बौद्धाचार्य प्रशांत कांबळे, बौद्धाचार्य सावताहरी कांबळे, डॉ.राहुल जाधव हे आहेत. सदरील कार्यक्रम दिवसभर सुरु राहणार आहे. या नंतर लगेच सकाळी १०.०० वा. भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे रक्त संकलन श्री. कमलाभवानी ब्लड सेंटर, करमाळा हे करणार आहेत. तर सदरील कार्यक्रमाचे उद़्घाटन सौ.सविताताई कांबळे (मा. नगरसेविका, करमाळा नगर परिषद) यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ६ वा. महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी महिला वर्गाने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे यांनी केले आहे. सदरील कार्यक्रमाचे उद़्घाटन भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक सौ.शोभाताई कांबळे मॅडम, सौ.पुष्पाताई कांबळे मॅडम, सौ.धाकतोडे मॅडम, सौ.अर्चनाताई कांबळे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी ७.०० वा. जनतेचे नगरसेवक जयकुमार (भाऊ) कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचे आयोजन भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केले आहे. या नागरी सत्कारासाठी प्रमुख उपस्थिती मा.दिग्विजयजी बागल (चेअरमन, मकाई सह.साखर कारखाना) हे राहणार आहेत. तर या नागरी सत्कारानंतर सायंकाळी ७.३० वा. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट, भव्य स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

आयोजक- जनतेचे नगरसेवक मा.जयकुमार (भाऊ) कांबळे मित्र परिवार व भिमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती, करमाळा 

(टिप- वरील सर्व कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक करमाळा, या ठिकाणी संपन्न होतील याची सर्वांनी दखल घ्यावी.)


Post a Comment