ज्या महिला स्वतःसाठी दिवाळी साजरी करीत नाहीत, किंवा त्यांची परिस्थिती त्यांना हा सण करू देत नाही. अशा बहिणीकडून लायन्स क्लब बार्शी टाउनच्या सभासदांनी ओवाळून घेतले. तसेच त्यांना ओवाळणीची भेट म्हणून साडीचोळी, संपूर्ण फराळ, अभ्यंग स्नान किट व त्यांच्या घरी दिवा लागावा म्हणून पणत्या देण्यात आल्या. या महिलांना उत्साह वाटावा, त्या परिस्थितीने खचून जाऊ नयेत, म्हणून त्यांना जैन साध्वी प.पू. अर्चनाजी म.सा यांनी भाऊबीजेचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.
अनोख्या भाऊबीज या कार्यक्रमासाठी अजित कुंकुलोळ-समाजसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांनी स्वतःचा पती सीमेवर उभा केला. व भारतवासीयांचे संरक्षण करत त्यांनी आपले प्राण गमावले. अशा वीरपत्नी श्रीमती अर्चना सुनील काळे याही उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी बहिणींच्या डोळ्यातील आनंद व अश्रू सर्वकाही सांगून गेले. लायन्स क्लब बार्शी टाउनचे अध्यक्ष ला.अमित कटारिया यांनी त्यांना आम्ही कधीही तुमच्या मदतीसाठी तयार आहोत असे आश्वासनही दिले. ही भाऊबीज साजरी करण्यासाठी सचिव ला. आदित्य कोठारी ,खजिनदार ला. राजाभाऊ काळे, प्रकल्प प्रमुख ला. अजय ढाळे व लायन्स क्लब बार्शी टाउनचे सभासद उपस्थित होते.
वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)




Post a Comment