करमाळा तालुक्यातील केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील ऊपक्रमशील सहशिक्षक बाळासाहेब देशमुख यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सांगोला येथील फॅबटेक काॅलेज मध्ये माजी आ. दिपक सांळुके यांच्या हस्ते देण्यात आला. बाळासाहेब देशमुख हे राजाभाऊ तळेकर विद्यालय सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्काऊट, या विदयालयात प्रथम पासून राबविला. त्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट शिबीर केम येथे घेतले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्काऊट मध्ये यश मिळविले आहे. त्यांचा प्रशालेतील प्रत्येक उपक्रमात सहभाग असतो.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माढा तालुक्याचे आ. बबन शिंदे, आ. संजयमामा शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक विनोद तळेकर, मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, रोपळे विदयालयाचे मुख्याध्यापक दळवी सर, सोलापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेच्या संचालिका शोभा लोंढे, महादेव लोंढे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख व सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, नूतन माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक रणदिवे सर, वडशिवणे विदयालयाचे मुख्याध्यापक भिमराव भोसले, श्री ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक नांगरे सर, श्री छत्रपती संभाजी विद्यालय मुख्याध्यापक व्यवहारे, केम केद्र प्रमुख महेश कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक जाधव एन. डि., माध्यमिक शिक्षक संघाचे मुकुंद साळुंखे व आलेगाव येथील भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment