गेल्या 10 वर्षापासून टेंभुर्णी-अहमदनगर रस्त्याचे काम सुरू असताना, करमाळा बायपास चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. परंतु गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याचे काम बंद असल्यामुळे, हा उड्डाणपूल देखील अर्धवट अवस्थेत तसाच आहे. या उड्डाणपुलामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पुलाच्या बाजूने रस्त्याला खड्डे पडले आहेत. या पुलामुळे बरेच वाहनधारक विरुद्ध दिशेने गाडी चालवून चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत या परिसरात बऱ्याच वेळा लहान, लहान अपघात झाले आहेत. परंतु यामुळे मोठा अपघात होणारच नाही, याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा उड्डाणपूल त्वरित पाडावा. अशी मागणी अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांनी केलेली आहे.
करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)



Post a Comment