Header Ads Widget

 


अकलूज-प्रतिनिधी

               बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने अकलूज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी बहुजन सत्यशोधक संघ राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की, राजस्थानमध्ये नऊ वर्षाच्या मुलाने मटक्यातील पाणी पिले म्हणून, कुमार इंद्रजीत मेगवाल या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. मातंग समाजातील जनार्दन कासारे यांची निर्गुण हत्याकांड करणाऱ्या जातीवादी गावगुंडांवर 302 /ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी न करण्यामुळे जातीवादी लोकांकडून एस.सी., एस.टी.वर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार वाढत आहेत. एस. सी., एस.टी. च्या लोकांवरती 395 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या शासनाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. व ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये, येणाऱ्या काळामध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील. असे त्यांनी यावेळी प्रतिपादन मांडले. डॉ. कुमार लोंढे म्हणाले की, बहुजन समाजाने जागृत होऊन युवकांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून राष्ट्रीय आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे. इंदु मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची उंची कमी केली असली, तरी बाबासाहेबांच्या विचारावर येथील युवक क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत. असे लोंढे यांनी त्यांचे विचार म्हणाले. उपस्थितांना संबोधित करत असताना महिंद्र लंकेश्वर व प्रदिप सरवदे यांनी हि त्यांचे विचार मांडले. 

               यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पालखे, महादेव लोंढे- जिल्हा उपाध्यक्ष, भैय्यासाहेब बाबर, रहीम मोहम्मद भाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन वाघमारे, टेंभुर्णी शहराध्यक्ष रोहित जगताप, संतोष जानराव, संजय बामणे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment