दि22/09/2022 रोजी मौजे-सरपडोह येथे रब्बी हंगाम 2022-23 मधील पीक लागवड तंत्रज्ञान आधारित शेतकरी प्रशिक्षण, तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ब्रम्हदेव सरडे (ऊस पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सोगाव) यांनी एकरी 125 टन ऊस लागवड तंत्रज्ञान व सचिन सरडे कृषी सहायक यांनी रब्बी पीक लागवड तंत्रज्ञान या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बनसोडे साहेब म. कृ. अ. जेऊर यांनी सेवा पंधरवडा व विविध योजनां विषयी मार्गदर्शन केले. या वेळी रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास कृ.स बेरे साहेब, सरपंच पांडुरंग वाळके, उपसरपंच नाथराव रंदवे, ग्रामसेवक खाडे भाऊसाहेब, पोलीस पाटील अंकुश खरात, अरूण चौगुले सर, तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ भिताडे व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपसरपंच नाथराव रंदवे सर यांनी मानले.सरपडोह येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत रब्बी हंगामासाठी पीक लागवड मार्गदर्शन व ज्वारी बियाणे वाटप
करमाळा-प्रतिनिधी



Post a Comment