Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                 मराठा सेवा संघ 32 व्या वर्धापण दिनानिमित्त व प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जंयती निमित्त संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सांगवी नं-2 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सर्व सेमी इंग्रजीची पुस्तके वाटप करण्यात आली. संपुर्णतः सेमी इंग्रजी असलेली तालुक्यातील हि एकमेव शाळा आहे. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, सौ. राऊत मॅडम यांच्या हस्ते व नितीन खटके- संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष, सरपंच सौ. शोभा आजिनाथ बनसोडे, सुहास पोळ- संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष करमाळा, अतुल निर्मळ- संभाजी ब्रिगेड जेऊर शहराध्यक्ष, रोहिदास दौंड- ग्रामविकास अधिकारी, सुहास शिंदे, वैभव तळे- उपसरपंच, शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब निंबाळकर, उपाध्यक्ष तुळशिदास शिंदे, पांडुरंग तळे ग्रा.प.सदस्य, दिनकर तळे ग्रा.प.सदस्य अजित तळे शा.व्यवस्थापन समिती सदस्य, काकासाहेब निंबाळकर, प्रगतशील बागायतदार रामेश्वर कोरे, चंद्रकांत गवळी, सुहास नागटिळक, अजित कांबळे शिक्षक, शंकर लोणकर- मुख्याध्यापक इत्यादी जण उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
             गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शाळेला सेमी इंग्रजीची पुस्तके भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे समाजाची बांधिलकी म्हणुन संभाजी ब्रिगेड तर्फे सामाजिक उपक्रम राबवत असताना प्रत्येक वर्षी शाळा, आश्रमशाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे. महापुरुषांच्या जयंती निमित्त मुलांना गणवेश, वह्या-पुस्तके, महापुरुषांचे फोटो, कोविड काळामध्ये गरीब लोकांना किराणा वाटप, अनाथांना कपडे, इत्यादी सामाजिक उपक्रम संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवेळी राबवले जातात. या कार्यक्रमाचे आभार काकासाहेब निंबाळकर यांनी मानले.

Post a Comment