Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)

           पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी, आंबे, गुरसाळे, उपरी अशा विविध ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. गुरसाळे येथे पत्रकार संरक्षण समितीचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे सर, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रेय हरिभाऊ कांबळे, तसेच श्री विठ्ठल वीट उद्योगाचे संचालक व उद्योजक विठ्ठलराव संभाजी बेडगे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपणासाठी येऊन फक्त फोटो काढुन, शुटिंग काढुन कोणी ही न जाता झाडांची निगा कशी राखावी या विषयी मार्गदर्शन करावे. असे रविंद्र विठ्ठल अधटराव यांनी सांगितले. सध्या अनेक कारणांमुळे वृक्षतोड होत आहे. त्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. असे आदिम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साळुंखे यांनी सांगितले. आदिम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव रवींद्र अधटराव यांनी उपस्थितांचे आभार मानले तर, दत्तात्रेय कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

          यावेळी उपस्थित आदिम बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साळुंखे, सचिव रवींद्र अधटराव, जिल्हा अध्यक्ष समाधान कोळी, विभाग प्रमुख प्रविण परमेश्वर, कोळी सह सचिव शुभम प्रकाश साळुंखे, विलास विठ्ठल बेडगे, माणिक कोळी, तुळशीराम कोळी, पत्रकार विकी साठे सर, नामदेव लकडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment