सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित संघमित्रा माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी येथे 75 वा "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, घरोघरी तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत शाळेत समूह राष्ट्रगान व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानी संघमित्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश भालशंकर सर होते. तर लक्ष्मण जाधव सर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षकेतर-कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. ही प्रभात फेरी शाळेपासून परिसरातील सर्व नगरात काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा दिल्या. तसेच घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन हि केले. यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्याना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
हा उपक्रम संपन्न करण्यासाठी गोपाळ शिंदे सर, सुनील शिंगे सर, गणेश तवरे सर, शरद भालशंकर सर, प्रतिभा पांडव मॅडम, कुंभार मनोहर, जानराव अमोल, विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुर्डूवाडी-प्रतिनिधी (शरद भालशंकर)



Post a Comment