Header Ads Widget

 


पांडे-प्रतिनिधी (आमजद मुजावर)

           पांडे येथे आजादी का अमृत महोत्सवांतर्गत 15 अॉगस्ट स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मारूती माने यांच्याकडून ५० फुट लांबीचा तिरंगी झेंडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देण्यात आला होता. या तिरंगी झेंड्याची गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. त्याचप्रकारे विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात विविध घोषणा हि दिल्या. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच आनिता मोटे यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भोसले यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. 

           शिक्षक, विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. यावेळी नायब तहसिलदार आशा दुधे, माजी पोलिस निरीक्षक रेवणनाथ दुधे, उपसरपंच नितीन निकम, ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, शिवाजी भोसले, माजी पोलिस कर्मचारी मारूती माने, मेजर सूर्यकांत कुंभार, मेजर उमाकांत आंधळकर, मेजर तात्या दुधे, मुख्याध्यापक लहू गभाले, बाळासाहेब आनारसे, कृषी सहाय्यक बी. जी. गाडे, आरोग्य सेविका दिक्षीत, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment