संपादन- प्रविणकुमार अवचर
भाऊ आणि बहिणीचे अनोखे अतुट नातं जपणारा सण म्हणजेच रक्षाबंधन, परंतु समाजामध्ये अशा अनेक बहिणी आहेत. त्यांना भाऊ नाही, यामुळे कुठेतरी या लहानशा चिमुकल्या बहिणींनाही रक्षाबंधनाचे, आकर्षण असते. ज्याप्रमाणे भाऊ, बहिणीचा पाठीराखा असतो. त्याचप्रमाणे बहिणीही बहिणींच्या पाठ राखीनी असतात. आज एकविसाव्या शतकामध्ये देशात स्त्री-पुरुष समानतेची जोपासना केली जात आहे. म्हणूनच समाजात असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जाऊ शकतो. माझे या माध्यमातून एवढेच सांगणे आहे की, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायला कमी झाल्या तरी चालतील. पण राखी बांधणारे हात कमी होऊ देऊ नका. मुलगी वाचवा मुलगी शिकवा....



Post a Comment