श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीगृह केम या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी वस्तीगृहितील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचे प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे व प्रा.अमोल तळेकर हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीगृहाचे चेअरमन व विद्यालयाचे प्राचार्य एस, बी. कदम हे उपस्थित होते.
यावेळी पार पडलेल्या "हर घर तिरंगा" या निबंध स्पर्धेत "माझा तिरंगा माझा अभिमान" या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच यावेळी वक्तृत्व स्पर्धामध्ये देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वसतिगृह अधिक्षक सागर महानगर यांनी केले होते. त्यांना अटल लॅब प्रमुख सरफराज मोमीन यांनी सहकार्य केले.श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वस्तीगृह केम या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न....
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)



Post a Comment