संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था मोडनिंब यांच्या वतीने, माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील परितक्ता असलेल्या महिलांना स्थानिक स्तरावर ग्रामसेवक व तलाठी, हे परितक्ता असल्याचे दाखले देत नसल्याबाबत संस्थेकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर होत्या. त्या अनुषंगाने संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक यांनी संस्थेच्या वतीने दि. 29 एप्रिल 2022 रोजी माढा तहसीलदा व गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांना निवेदन देण्यात आले होते. ग्रामीण भागातील परितक्ता महिलांना कनिष्ठ स्तरावर दाखले मिळवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. आणि परितक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी परितक्ता दाखल्याची मागणी केली जाते. परंतु स्थानिक स्तरावर ग्रामसेवक व तलाठी हे परितक्ता असल्याचे दाखले देत नसल्यामुळे, अशा अनेक महिला या संजय गांधी निराधार योजने पासून वंचित आहेत. तेव्हा कनिष्ठ स्तरावरून दाखले उपलब्ध करून देण्यात यावेत. अथवा ती अट रद्द करावी, किंवा शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरती त्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन तेच परीतक्ता दाखला असल्याचे ग्राह्य मानावे. व तसे आदेश देण्याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु याबाबत दोन्ही कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने दि. 14 जुलै 2022 रोजी स्मरणपत्राद्वारे दोन्ही विभागांना दि.14 ऑगस्ट 2022 रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन दिले होते.
परंतु आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी माढा तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागाचे हनुमंत यादव यांनी व्हाट्सअप द्वारे, आज करणार असलेले उपोषण स्थगित करण्याबाबतचे पत्र व स्थानिक स्तरावर ग्रामसेवक यांनी परितक्ता दाखला देणे बाबतचे, गटविकास अधिकारी यांना दिलेले पत्र असे दोन्ही पत्र व्हाट्सअप ला मिळाले असून, तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अंतर्गत ग्रामसेवक व तलाठी यांची संयुक्त मिटिंग घेऊन, माढा तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी यांनी परितक्ता दाखले द्यावेत. यासाठी पुन्हा एकदा सूचना देण्याबाबतचे दूरध्वनीवरून तोंडी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आज रोजी संस्थेच्या वतीने होणारे आंदोलन तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केले आहे. जर पुन्हा स्थानिक स्तरावर या महिलांना अडचणी निर्माण झाल्यास भविष्यात उपोषण केले जाईल. असे निवेदन माढा तहसीलदार यांना व माहितीसाठी प्रत म्हणून पोलीस निरीक्षक माढा पोलीस स्टेशन तसेच पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे.
मोडनिंब-प्रतिनिधी



Post a Comment