Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

              श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण, येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी व रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प प्रभावीपणे चालविला जातो. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना भौगोलिक, ऐतिहासिक, औद्योगिक घटकांची माहिती व्हावी. या उद्देशाने बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आलेले होते. या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना उजनी धरणाची माहिती व्हावी. तसेच कोटलिंग मंदिराची माहिती आणि त्याचा इतिहास समजावा. या दृष्टिकोनातून क्षेत्रभेट आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी तेथील ऐतिहासिक घटनांची नोंद करून घेतली. सदर क्षेत्रभेटी साठी 650 विद्यार्थी सहभागी झालेले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था श्री कोटलिंग मंदिर समितीचे आत्माराम नेमाने यांनी केली.

                 सदर क्षेत्रभेटीचे आयोजन व क्षेत्रभेटी यशस्वी होण्यासाठी, विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने, रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प प्रमुख साईनाथ लोहार, क्षेत्रभेट प्रमुख नवनाथ शेंडगे, शिवाजी मासाळ, सचिन खाडे, धनंजय भोसले, लक्ष्मण गोडगे, अशोक मुंडे, रेवणनाथ जाधव, बिभिषण भोई, श्रीकांत बिराजदार, योगेश धस, सोनाली बुधकर, श्रीम. नुतन धुमाळ यांनी सहकार्य केले.

Post a Comment