Header Ads Widget

 


पांडे-प्रतिनिधी (आमजद मुजावर) 

              पांडे, म्हसेवाडी, अर्जुननगर, करंजे आदी गावांना वरदान असलेला म्हसेवाडी तलाव निसर्गाच्या कृपेने शंभर टक्के भरल्याने, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हसेवाडी तलाव लवकर भरला आहे. गेल्या वर्षी परतीच्या पाऊसाने पावसाळ्याच्या शेवटी म्हसेवाडी तलाव शंभर टक्के भरला होता. परंतु या वर्षी म्हसेवाडी तलाव दोन महिने लवकर भरून  सांडवा वाहु लागला आहे. या तलावावर पांडे, म्हसेवाडी, अर्जुननगर गावाचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच शेतीसाठी तलाव, नाले, बंधारे तुडुंब भरल्याने या परिसरातील  विहीरव व बोअरचे पाणी वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

               ग्रामस्थांनी  दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी म्हसेवाडी तलावात सोडण्याची मागणी लोक प्रतिनिधींकडे  केली होती. परंतु वरुणराजाच्या कृपेने म्हसेवाडी तलाव शंभर टक्के भरला आहे.

Post a Comment