Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 

        विद्यानगर, तालुका करमाळा येथील ईगल लीप इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 19/08/22 शुक्रवार रोजी, श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी दहिहंडी सोहळ्यामध्ये आनंदाने सहभाग घेतला होता. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी कृष्णा, राधा, गोपिका अशी वेशभूषा करून, बाळ गोपाळांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. दहीहंडी हा वर्षातला असा एकच दिवस आहे. जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर चढण्यासाठी प्रमाणिकपणे मदत करतो. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने लक्ष गाठण्याची शिकवण देणारा संदेश दहीहंडी मार्फत बालचिमुनी दिला. 

             यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद फंड सर ,ईगल लीपचे अध्यक्ष महेश दिवेकर सर, उपाध्यक्ष विजय बागल, सदस्य पोपट धुमाळ, मुख्याध्यापिका स्वप्नाली दिवेकर, विभाग प्रमुख सचिन पाटील ,प्रीती मिस ,कोमल मिस, सिद्धी मिस व पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment